Fibroid आणि संयुक्त उपचार पद्धती

PCOD प्रमाणे COMMON असणारा आणि आज काल बहुसंख्य स्त्रियांमध्ये दिसून येणारा आजार म्हणजे Fibroid. याच वर्णन म्हणजे गर्भाशायाच्या थरामध्ये किंवा गर्भाशयाच्या वर किंवा गर्भाशयाच्या आतमध्ये आलेल्या ट्युमर सारख्या गाठी. बहुसंख्य वेळा अशी गाठ ट्युमर प्रमाणे दिसत असली तरी ती cancerous असतेच असे नाही . परंतु याचा पेशंट ला अतोनात त्रास होवू शकतो. पाळीच्या वेळी प्रचंड प्रमाणात रक्तस्त्राव जाणे, ओटीपोटात प्रचंड वेदना होणे, अधे मध्ये कधीही रक्तस्त्राव होणे, अशक्तपणा येणे, गर्भधारणेसाठी अडचणी येणे असे त्रास या गाठी देवू शकतात. स्त्रीच चांगल गर्भाशय ही तिच्या चांगल्या आरोग्याची साक्ष असते. जर गर्भाशया संबंधित काही त्रास असेल तर त्या स्त्रीचे शारीरिक, मानसिक , आणि भावनिक संतुलन पूर्णपणे ढासळलेले असते. अशा हजारो स्त्रिया आज कुटुंब, करीअर, परंपरा आणि ढासळलेले आरोग्य या साऱ्या आघाडीवर सामना करत असतात. अनेकदा अशी स्त्री गळून गेलेली असते, प्रचंड आजारी असते, नैराशवाद आणि चीडचीडेपणा यांची बळी ठरलेली असते.
या गाठी कशामुळे होतात याच नेमक कारण अजून तरी शोधता आलेलं नाही. काही प्रमाणात अनुवांशिकता यांना जबाबदार असते. कधी कधी ज्या स्त्रियांना PCOD चा विकार असतो त्यांच्या मध्ये देखील Fibroid आढळून येतो. गर्भाशयाच्या काही स्नायू पेशीं एकत्र येवून गाठ यायला सुरुवात होते आणि ती इस्ट्रोजेन नावाच्या संप्रेरका मुळे वाढण्यास सुरुवात होते. हा आजार आज काल वयात येणाऱ्या मुली पासून मध्यमवयीन स्त्री पर्यंत सर्व वयोगटा मध्ये दिसून येत आहे. व्यायामाचा अभाव, बैठी जीवन शैली, सतत तळलेले , प्रोसेस केलेले जंक फूड खाण्यात येणे, अशी Life-style जर असेल तर त्याचेही योगदान अशा आजारांना निमंत्रण देणारे ठरू शकते.
Fibroid चे लक्षणे काही स्त्रियांमध्ये तो आजार वाढेपर्यंत अजिबात दिसून येत नाहीत. काही स्त्रियांमध्ये थोडी अथवा खूप गंभीर अशी लक्षणे सुरुवातीच्या काळातच दिसून येतात. तुम्हाला खालील पैकी कुठल्या गोष्टींचा खूप जास्त त्रास होत असेल तर वेळीच वैद्यकीय तपासणी करून घेणे गरजेचे आहे
• मासिक पाळी उशीरा येणे अथवा २-२ महिने न येणे.
• कंबर आणि पाठ प्रचंड प्रमाणात दुखणे.
• दोन मासिक पाळीच्या मध्ये कधीही रक्तस्त्राव होणे.
• सतत लघवीला जाण्याची भावना होणे.
• मासिक पाळीच्या वेळी प्रचंड प्रमाणात रक्तस्त्राव होणे.
Fibroid ओळखण्याची सर्वमान्य पद्धत म्हणजे गर्भाशयाची सोनोग्राफी होय. सोनोग्राफी करून या गाठींचे निदान करता येवू शकते. सर्वसामन्यपणे सदर गाठी सर्जरी करून काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो. परंतु Fibroid जरी एकदा operate करून काढून टाकला तरी तो परत येवू शकतो.
आयुर्वेद आणि Homoeopathy संयुक्त उपचार पद्धती मध्ये मात्र अशा प्रकारच्या गाठी योग्य औषधोपचारांद्वारे घालवून देता येवू शकतात. तसेच या गाठी शरीरात परत परत वाढण्याची प्रवृत्ती असेल तर ती प्रवृत्ती मुळापासून काढून टाकण्यासाठी औषधांची योजना केली जाते. आयुर्वेदा नुसार शरीरातील कफ , पित्त , वात हे त्रिदोष हे भडकले त्यांचे मोठ्या प्रमाणावर असंतुलन होवून ते एकमेकांमध्ये मिसळले असता शरीरात अशी (extra growth) गाठी होण्याची प्रवृत्ती निर्माण होते. त्यासाठी संयुक्त उपचार पद्धती मध्ये रुग्णास प्रथम पंचकर्म घेण्याचा सल्ला दिला जातो. पंचकर्म घेतल्या नंतर शरीरातील कफ , पित्त, वात हे त्रिदोष जाग्यावर येवून शरीर हलके होते. असे शरीर उपचारांना उत्तम प्रतिसाद देते. त्यामुळे Fibroid सारख्या गाठी लवकर घालवण्यास मदत होवू शकते.
अश्विनी – अनंत मध्ये सहसा अशा केसेस मध्ये पहिल्यांदा स्त्री रुग्णाची ची शारीरिक आणि मानसिक स्थिती पाहिली जाते.घराण्याची तसेच शारीरिक आजारांची बारीक सारीक History घेतली जाते. त्यांनतर नाडी परीक्षण करून रुग्णाची प्रकृती निश्चित केली जाते त्यानुसार संपूर्ण आहार- विहार आणि व्यायामाचे नियोजन केले जाते. Fibroid वर homoeopathic आणि आयुर्वेदीक उपचार संयुक्त पद्धतीचे आश्चर्यकारक परिणाम दिसून आलेले आहेत. या उपचारांद्वारे शेकडो स्त्रियांना त्यांच्या आजारातून दिलासा मिळाला आहे. स्त्रीचे शरीर ही तिची देणगी आहे. त्याच्या आरोग्याची जपणूक करणे त्याला सुदृढ ठेवणे ही जबाबदारी केवळ त्या स्त्रीची नसून तिच्या कुटुंबाची देखील आहे कारण आरोग्याने परिपूर्ण स्त्री च एक चांगले कुटुंब घडवू शकते. कुटुंबाचा आधार बनू शकते. त्यामुळे रोग अंगावर न काढता वेळीच त्याचा नायनाट करणे उत्तम ठरते.

Add Comment

Required fields are marked *. Your email address will not be published.