शरीरामध्ये जरुरीपेक्षा मेद साठून राहणे ही अवस्था म्हणजे लठ्ठपणा होय. जेंव्हा आपण खर्च केलेल्या उष्मांकापेक्षा जास्त उष्मांक अन्नाच्या रूपाने घेतो त्यावेळी जास्तीचा उष्मांक शरीरात मेदाच्या रूपाने साठवला जातो. असा वाढलेला मेद हृदय विकार, यकृताचे विकार, डायबेटीस, गुढग्याचे आजार अशा अनेक प्रकारच्या दुर्धर आजारांना निमंत्रण ठरू शकतो. जागतिक स्तरावर आज दर सहा व्यक्तीच्या पाठीमागे एक व्यक्ती लठ्ठ (obese) असते.

 

अनेक वेळा लठ्ठपणा हा आजार आहे हे लक्षात येत नाही. कुठल्याही प्रकारच्या diets ला, औषधाला, उपवासालाव्यायामाला शरीर प्रतिसाद देत नाही. परंतु फार कमी जणांना हे माहिती आहे की होमिओपॅथी आणि आयुर्वेद मेदरोगाच्या मुळाशी जावून शरीरातून जुनाट मेद काढून टाकू शकते. आमच्या इथे लठ्ठपणाची शिकार झालेल्या अनेक रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांचे वजन आटोक्यात आणण्यात मदत झाली आहे.

 

होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक उपचार पद्धती लठ्ठपणाची शरीराची मूळ प्रवृत्ती(Body Tendancy) नष्ट करण्यात अत्यंत परिणामकारक ठरली आहे. पंचाकर्माद्वारे शरीरामधील विषद्रव्ये काढून टाकल्यावर शरीर हलके होते आणि उपचारांना तसेच व्यायाम आणि आहार नियंत्रणाला उत्तम रीतीने प्रतिसाद देते.

 

वयात आलेल्या मुली, मध्यमवयीन महिलांना (Polycystic Overy Syndrom) P.C.O.D मुळे अनियमित ऋतूचक्र आणि त्यामुळे वजन वाढणे या समस्यांना सामोरे जावे लागते. P.C.O.D होणे आणि त्यामुळे वजन वाढणे तसेच वजन खूप जास्त वाढल्यामुळे परत P.C.O.D होणे हे महिलांच्या बाबतीमधले दुष्टचक्र आहे. हा आजार मुळापासून नष्ट करून शरीरातील संप्रेरकांचा(Hormone) समतोल राखणेहे आमच्या इथे केल्या जाणाऱ्यासंयुक्त उपचार पद्धतीमुळे शक्य झाले आहे.