vlcsnap-2016-03-29-11h17m16s151

डॉ. विवेकएस. कुलकर्णी हे २० वर्षाहून अधिक काळ रुग्णसेवे मध्ये कार्यरत आहेत. होमिओपॅथी आणि आयुर्वेद या दोन्ही उपचार शाखांचेप्रगल्भ ज्ञान त्यांनी आजवरच्या आपल्या अभ्यासातून आणि सेवेमधून मधून जोपासले आहे. त्यानी आपली D.H.M.S. पदविका राजर्षी छत्रपती शाहू होमिओपॅथिक मेडीकल कॉलेज, इस्लामपूर येथून १९९१ साली घेतली.  त्यानंतर १९९५ साली डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथून त्यानी B.H.M.S. पदवी प्राप्त केली.

 

त्यांना “Indian Board of Alternative Medicines” तर्फे M.D. (in alternative medicines) म्हणून गौरवण्यात आलेले आहे.

 

स्वतःच्या संशोधन आणि रुग्णसेवेतून मिळालेल्या अनुभवातून डॉ कुलकर्णी यांनी स्वतःच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आणि रुग्णाला सर्वोत्तम उपचार मिळावा यासाठी आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी ची संयुक्त उपचार पद्धती विकसित केलेली आहे.

 

प्रत्येक उपचार पद्धतीची स्वतःची बलस्थाने असतात. कुठली उपचार पद्धती चांगली यावरच्या विवादापेक्षा रुग्णाचा आराम आणि रुग्ण रोगमुक्त होणे सर्वात महत्वाचे. स्वतः होमिओपॅथिक डॉक्टर असताना आयुर्वेदिक उपचार पद्धतीचे विवरण जाणून घेण्यासाठी याच विचारातून १९९५ साली वैद्यकीय प्रॅक्टिस ला सुरुवात केल्यानंतर डॉ. कुलकर्णी यांनी २००० साली आपल्या  वैद्यकीय प्रॅक्टिस मधून स्वल्प काळासाठी विराम घेतला.  त्यांनी श्री. अनंत करंबेळकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली, जि. सिंधुदुर्ग, महाराष्ट्रया ठिकाणी आयुर्वेद आणि आयुर्वेदिक पंचकर्म उपचार पद्धती बद्दल ज्ञान प्राप्त केले.

 

प.पु. स्व.करंबेळकरगुरुजींच्यासान्निध्यातकाही काळ राहिल्यानंतर जुलै २००१ पासून डॉ. कुलकर्णी यांनी आपली वैद्यकीय प्रॅक्टिस पुन्हा चालू केली. आजच्याअश्विनी –अनंत होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक रुग्णालयाचे उद्घाटन १३ नोव्हेंबर २००४ रोजी भारताचे माजी कृषीमंत्री श्री.शरदचंद्रजी पवार (साहेब) यांच्या हस्ते झाले.हे रुग्णालय म्हणजे प्राचीन आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक उपचार पद्धती चे एकअद्वितीय केंद्र झाले आहे असे म्हणण्यास हरकत नाही.  डॉ. कुलकर्णी यांची प्रॅक्टिस होमिओपॅथी , आयुर्वेद यांच्या बरोबरच वनौषधी , पुष्पौषधीयाविषयांना देखील वाहिलेली आहे.

 

आयुर्वेदिक आणि होमिओपॅथीक औषधांचे एकत्रीकरण करून त्यायोगे अधिक चांगल्या प्रकारे रुग्णांवर उपचार करणे हे डॉ. कुलकर्णी यांच्या प्रॅक्टिस चे वैशिष्ट्य म्हणता येईल. आपल्या ज्ञानाच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो रुग्णांवर डॉ. कुलकर्णी यांनी उपचार केलेले आहेत. त्यांनी हाताळलेल्या  अनेक यशस्वीकेसेस आहेत ज्यामध्ये कॅन्सर, उच्च रक्त दाब, हाय- कोलेस्टेरॉल, किडनी फेल्युअर, सर्व्हायकल अँड लंबरस्पॉंडायलोसीस, स्त्रियांचे आजार, पॅरालीसीस, लठ्ठपणा  अशा दुर्धर आजारांचा समावेश आहे.  स्वता:च्या संशोधन आणि उपचार पद्धतीच्या माध्यमातून त्यांनी अनेक कठीण मेडीकल केसेस हाताळलेल्या आहेत.आजAlternative Medicines या विषयामध्ये डॉ. कुलकर्णी हे एक तज्ञ आणि नावाजलेले डॉक्टर म्हणून ओळखले जातात. अश्विनी –अनंत होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक रुग्णालयाच्या माध्यमातून त्यांनी आयुर्वेदाची आणि होमिओपॅथी ची प्राचीन तरीही कमी खर्चिक आणि सर्वात गुणकारी अशी  उपचार पद्धतीची परंपरा कायम ठेवली आहे.