पंचकर्म चिकित्सा:

पंचकर्म चिकित्सा ही शरीराच्याशुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. शरीर शुद्धी, उत्तम आरोग्य, उत्तम शारीरिक समतोल आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी पंचकर्म अत्यंत उपयुक्त अशी चिकित्सा आहे. व्यक्तीच्याआरोग्याचीपरीक्षाही तिच्या शरीराची शुद्धी, सर्व अवयवांचे योग्य चलन-वलन, सकारात्मक दृष्टीकोन, आनंदीआणि प्रत्येक गोष्टी मध्ये उत्तमतेचा ध्यास घेतलेले मनअशा लक्षणांवरून करता येते. जेव्हा शरीरामध्ये रोगांची वस्ती होते त्यावेळी शरीराच्या महत्वाच्या अवयवांमध्ये बिघाड होण्यास सुरुवात होते. पंचकर्मव्यक्तीच्या शरीरातील विषद्रव्ये  पूर्णपणे निचरा करून तिच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक सौंदर्याची जपणूक करते.

आमच्या कडे पंचकर्म चिकित्सा अंतर्गत व्यक्तीच्या गरजेनुसार विविध प्रकारचे उपचार केले जातात.

 

स्नेहन

शरीर शुद्धीकरणाच्या प्रक्रियेमधील प्रथम चरण म्हणजेस्नेहन प्रक्रियाहोय. त्याला पूर्वकर्म असेही म्हणतात. या प्रक्रियेमध्ये शरीरास आयुर्वेदानुसार सिद्ध केलेल्या सिद्ध तेलाने मसाज(मर्दन) केला जातो.हा मसाज शरीरातील स्नायूंच्या रचनेप्रमाणे तसेच रोग्याच्या प्रकृती प्रमाणे आणि वेळेनुसार केला जातो. याच्यामुळे शरीरामध्ये असलेला मेद सुटून येण्यास सुरुवात होते. स्नेहन प्रक्रियेमुळे शरीराच्या  त्वचेला तकाकी येण्यास मदत होते.  स्नेहनामुळेशरीराची त्वचा चमकदार, घट्ट आणि नितळ  बनते. या प्रक्रियेमध्ये शरीराची रंध्रे खुली केली जातात. त्यामुळे शरीरामध्ये साठलेला मळ निघून जाण्यास मदत होते. संपूर्ण शरीराचे रक्ताभिसरणाचे कार्य सुधारते. स्नेहन उपचार पद्धती ह्रदयाचे विकार असलेल्यांना तसेच रक्तवाहिनी मध्ये अडथळा निर्माण करणारेब्लॉककाढून टाकण्यात महत्वाची भूमिका बजावते. स्नेहन उपचार पद्धतीचा उपयोग मणक्याचे सर्व आजार, संधिवात, लठ्ठपणा, व्हेरिकोज व्हेन्स, सायटीका, मासिक पाळीच्या तक्रारी इ. आजारांमध्ये होतो.

 

नस्य

नस्य विधी हा नावाप्रमाणे नाकाद्वारे दिलाजातो. प्रथमयोग्यऔषधांचे उपयोजन करून त्याचे   ३-५ थेंब दोन्ही  नाकपुडीत सोडले जातात. त्यानंतर २ मिनिटांनी सध्या गाईच्या तुपाचे ३-५ थेंब दोन्ही नाकपुडीत सोडून नस्य विधी दिला जातो.  नस्य विधीचेफायदे अर्धशिशी , निद्रानाश, केसांचे विकार , नाकाची व तोंडाची कोरड , जुनी सर्दी, नाकपुडी बंद होणे. इ. प्रकारच्या रोगांमध्ये होतात.

 

नेत्र बस्ती

नेत्र बस्ती मध्ये ४-५ प्रकारची औषधे उपचारांच्या वेळीच ताजी बनवून आणि त्यांचा अर्क काढून दोन्हीडोळ्यांमध्ये सोडली जातात. त्याचा उपयोग डोळ्याचा नंबर कमी करण्यासाठी, डोळ्यांचे विकार बरे करण्यासाठी होतो.

 

शिरोबस्ती

शिरोबस्तीमध्येगाईच्या दुधामध्ये औषधी पावडर भिजवून त्याचा लेप माथ्यावर दिला जातो तसेच दुसऱ्या प्रकारामध्ये१-२ प्रकारच्या औषधी वनस्पती चूर्ण करून त्याचा लेप माथ्यावर दिला जातो. या प्रकारात कानाच्या पाठीमागे देखील औषधी वनस्पतीचा लेप दिला जातो. शिरोबस्ती चा उपयोग मेंदूचे आजार, झोपेचे विकार , कमी रक्त दाब , कानाचे विकार, इ. प्रकारच्या आजारांमध्ये केला जातो.

 

बस्ती

शरीराच्या मोठ्या आतड्याची शुद्धी करण्यास बस्ती ही सर्वोत्तम पद्धत आहे. या पद्धतीचा उपयोग व्यक्तीच्या शरीरात वाढलेला वात दोष पूर्णपणे दूर करण्यासाठी होतो. वात दोष हा शरीराची चयापचय क्रिया बिघडवून लठ्ठपणा निर्माण करण्यास प्रामुख्याने कारणीभूत असतो. या पद्धतीमध्ये सिद्ध काढ्याने, दुधाने,तुपाने युक्त कोमट पाण्याचा एनिमा पेशंट ला दिला जातो.वातदोष हा प्रामुख्याने मोठ्या आतड्यामध्ये उत्पन्न होत असल्यामुळे केवळ बस्तीप्रक्रीये द्वारे या दोषाचे निवारण केले जावू शकते. या उपचार पद्धतीचा उपयोग लठ्ठपणा कमी करण्यासाठी तसेच चेतना संस्थेचे आजार बरे करण्यासाठी केला जातो. याशिवायआतड्यांच्या चयापचय क्रिया नियमित करण्यासाठी, सर्वसामान्य कफ, लैंगिक दोष, पित्ताशयाचे खडे, हृदयाचे दुखणे, उलट्या, गाऊट, पाठींचे दुखणे, पोटदुखी, अपचन, आम वात अशा अनेक आजारांमध्ये बस्ती उपचार आराम मिळवून देवू शकतो.

 

स्वेदन

स्वेदन पद्धतीला steem baath म्हणून ही ओळखले जाते. अश्विनी –अनंत रुग्णालयामध्ये दिली जाणारी स्वेदन उपचार पद्धती ही एकमेव आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे ज्याच्यामधून या स्वेदन पद्धतीचे फायदे रुग्णाला मिळू शकतील. रुग्णाच्या प्रकृती नुसार आणि आजारानुसार औषधे एकत्र करून तसा काढा तयार केला जातो. एक व्यक्ती बसू शकेल अशा प्रकारच्या खास तांब्याच्या मोठ्या भांड्यात सिद्ध काढ्याने युक्त सोसेल इतके गरम  पाणी भरून त्यामध्ये बसवून रुग्णास ही उपचार पद्धती दिली जाते. अशा भांड्यामध्ये बसल्यानंतर डोके सोडून गरम पाण्याची पातळी हळूहळू वाढवत ती छाती पर्यंत आणली जाते. १०मिनिटा नंतर शरीरामधील रंध्रे खुली होतात , रक्ताभिसरण प्रक्रिया वाढते, रक्तवाहिन्यांचे रुंदीकरण होते , शरीरात साठलेला मेदयुक्त मल घामावाटे बाहेर काढला जातो. अशा वेळी Dehydration टाळण्यासाठी रुग्णास कोकम सरबत दिले जाते. ही उपचार पद्धत रुग्णाच्या नाडीनुसार १० ते २० मिनिटे दिली जाते. स्नेहना द्वारे सुटे झालेले विषद्रव्ये स्वेदन प्रक्रियेमध्ये पूर्णपणे शरीराच्या बाहेर टाकली जातात. स्वेदन दिल्यानंतर रुगास शरीर अतिशय हलके वाटू लागते.

 

स्वेदन पद्धती हे शरीरातील दोष वितळवून बाहेर फेकण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. गुढग्याचे आजार, हृदयरोग, हृदयाच्या रक्तवाहिन्यातील अडथळे, मणक्याचे आजार, पाळीच्या तक्रारी, अशक्तपणा, दमणूकस्नायूंचे दोष अशा आजारांमध्ये स्वेदन पद्धती रुग्णास आराम देणारी ठरते.

 

आमच्या इथे पंचाकार्माद्वारे खालील आजारांवर केले जाणारे उपचार 

 • रक्तात वाढलेली cholesterol ची पातळी
 • मणक्याचे आजार
 • दुखरा खांदा आणि मज्जासंस्थेचे विकार
 • दमा आणि श्वसनाचे विकार
 • मुळव्याध
 • नाक, घसा, कानाचे विकार
 • अर्धशिशी
 • त्वचाविकार, सोरायसिस, इसब, गजकर्ण, मुरुमे, नायटा इ.
 • निद्रानाश
 • अर्धांगवायू
 • पचनाचे विकार
 • डायबेटीस
 • स्त्रियांचे आजार आणि मासिक पाळी संदर्भातील समस्या
 • संधिवात