“अश्विनी –अनंत होमिओपॅथीक आणि आयुर्वेदिक रुग्णालय” हे रुग्णांच्यासेवेसाठी सुसज्ज आणि सुविधांनी परिपूर्ण आहे. आवश्यकतेनुसार रुग्णाला एकापेक्षा अनेक दिवस उपचारांसाठी राहावयाचे असल्यास त्यासाठी स्वतंत्र निवास व्यवस्था उपलब्ध आहे. इथे केल्या जाणाऱ्या संपूर्ण आयुर्वेदिक उपचार पद्धती या संशोधन करून निर्माण केलेल्या आणि रुग्णाला जास्तीत जास्त परिणाम मिळवून देणाऱ्या अशा आहेत. रुग्णालयाचे वातावरण रुग्णाच्या शरीराला आणि मनाला आनंददायक ठरेल अशा प्रकारचे शांत आणि आल्हाददायक बनवण्यात आलेले आहे. स्त्री आणि पुरुषांसाठी वेगळे उपचार कक्ष आहेत.

 

उपचारात्मकसेवा आणि इतर व्यवस्था:

रुग्णालयात केले जाणारे उपचार हे होमिओपॅथीआणि आयुर्वेदिक उपचार पद्धतीचे अनुभवसिद्ध ज्ञानअसणाऱ्या डॉक्टर तर्फे केले जातात. येथे केली जाणारी उपचार पद्धती ही पंचकर्म चिकित्से द्वारे संपूर्ण शरीरातून विषद्रव्ये बाहेर काढून रोग्याला आराम मिळवून देणे या तत्वावर आधारलेली आहे. त्यासाठीआवश्यक असणाऱ्या खोल्या संपूर्ण सुसज्ज व्यवस्थेसह रुगांच्या सेवेसाठी सज्ज आहेत. स्नेहन, स्वेदन, बस्ती, नस्यअशा विविध उपचार पद्धती साठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. स्वतंत्र होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक मार्गदर्शन रुग्णाला अश्विनी-अनंत क्लिनिक मध्ये उपलब्ध आहेत.

 

अंतरंग

१. शांतआणि शुद्ध वातावरण, प्रशस्त जागा,
२. स्वच्छ, सुसज्जआरामदायकउपचारकक्ष,
३. स्वच्छ , सुसज्ज निवास खोल्या,
४. स्वतंत्र भोजन व्यवस्था
५. दैनंदिन तपासणी
६. आयुर्वेदिक आणि होमिओपॅथीक औषधांची सुविधा
७. पथ्याच्या आहाराची व्यवस्था
८. कमी खर्चिक उपचार पद्धती
९. आहार मार्गदर्शन
१०. वाचनालय