होमिओपॅथी

होमिओपॅथी ही उपचारात्मक पद्धत शोधून त्याला विकसित करण्याचे श्रेय जर्मन डॉक्टर सॅम्युएल हानिमान( १७५५-१८४३)यांना जाते. होमिओपॅथी चा शोध तसा २००वर्षाहून अधिक  जुना आहे. आज भारत आणि उर्वरित जगामध्ये होमिओपॅथी एक परिणामकारक उपचार पद्धती म्हणून मान्यता प्राप्त आहे. अनेक गुंतागुंतीच्या केसेस मध्ये होमिओपॅथी ची उपयुक्तता आजवर सिद्ध झालेली आहे. आज होमिओपॅथी जगातील २ ऱ्या क्रमांकाचीसर्वात जास्त घेतली जाणारी उपचार पद्धती आहे.

 

अगोदर म्हटल्या प्रमाणे होमिओपॅथी उपचार पद्धती ही आज एक सर्वांगीण, सर्वव्यापी आणि अजोड अशी उपचार पद्धती म्हणून ओळखली जाते. आयुर्वेदा प्रमाणे ही देखील पॅथी उपचारामध्येमानसिकतेचा, मानसिक दृष्टीकोनाचा कसोशीने विचार करते. काट्याने काटा काढणे अथवा विषाने विष मारणेअशा उक्तीनुसार “Like Cures Like” या तत्वावर हीउपचार प्रणाली काम करते. औषधांचे अंगभूत गुणधर्म विकसित करून आणि वाढवून (potentiality) रोग समूळपणे नष्ट कसा करता येईल यावर  होमिओपॅथी मध्ये भर दिला जातो.

 

“होमिओपॅथी फक्तरोगाच्या लक्षणावर उपचार करण्यास भर देत नाही तर रोग हा ज्या शरीराचा भाग आहे त्या संपूर्ण शरीराचे मनाचे चलनवलन कसे ठीक करता येईल हे पाहते. आपल्या उपनिषदामध्ये विषद केलेल्या शरीर , आत्मा, मनया  संकल्पना होमिओपॅथी मध्ये सुद्धा आहेत. भारता सारख्या वैद्यकीय सोयी सुविधाचा अभाव असलेल्या देशात होमिओपॅथी उपचार पद्धती वरदान ठरू शकते.”  

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

 

डॉ. राधाकृष्णन यांच्या सारख्या कुठल्याही आदरणीय व्यक्तीचे बोल होमिओपॅथी चे महत्व आणि परिणाम विषद करून सांगू शकतात. शरीराचा अंतर्गत समतोल बिघडू न देता रोग बरे करण्याची क्षमता होमिओपॅथी मध्ये आहे. होमिओपॅथी केवळPotency  वाढवलेल्या औषधांचा संच नाही यामध्ये शरीरशास्त्रा बरोबर मानसिक आरोग्याचा आणि तत्वज्ञानाचा ही परिपूर्ण विचार केला गेला आहे.

 

आयुर्वेद

 

आयुर्वेद हे स्वतः बद्दल औषधी शाखा या संकल्पाने पेक्षा अधिक काही सांगते. ही एक जीवन प्रणाली आहे. ज्याचा पाया उत्तम आरोग्य, बुद्धी मन आणि आत्मा आहे.  रोगांवर काय इलाज केला पाहिजे याही पेक्षा आयुर्वेद आपणास रोग बरा करण्यासाठी संपूर्ण आयुष्य कसे समतोल पद्धतीने जगले पाहिजे हे शिकवते. आयुर्वेदामध्ये आपल्या शरीरामध्ये होणाऱ्या बदलाचे निरीक्षण, दैनंदिन आहार – विहार, व्यायाम, ध्यान-धारणा, योग साधना, उपासना, सर्वजीवांबद्दल करुणा, ज्ञान अशा उत्तम आयुष्य जगण्यास आवश्यक सर्वांगीण घटकाचा विचार केला गेलेला आहे. केवळ रोगांच्या लक्षणावर उपाय करण्यापेक्षा रोग निर्माण करणाऱ्या मूळ प्रवृत्ती नष्ट करणे हाच आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा उद्देश आहे. ज्यायोगे पंचाकर्मा द्वारेशरीर शुद्धी करून आहार – विहाराच्या सवयीचे पालन करून दीर्घ आणि निरोगी आयुष्याचा आनंद घेता येवू शकतो.

 

जर शरीर, आत्माआणि मन या तिन्ही मध्ये समतोल असेल तरच उत्तम आरोग्याची प्राप्ती होवू शकते. त्यामुळे आयुर्वेदा मध्ये पंचाकर्मा द्वारे शरीर शुद्धी करून संपूर्ण शरीर , मन आणि आत्मा या तिन्हींचा समतोल राखण्याचे कार्य केले जाते.

 

शरीरामध्ये असलेल्या त्रिदोषांचे संतुलन करूनचपंचकर्मा मध्ये शरीर शुद्धी केली जाते. आयुर्वेदानुसारशरीराचे आरोग्य शरीरात वास्तव्य करून असलेल्या कफ, पित्त, वातत्रिदोषांच्या(तत्वांच्या) आधारे ठरवले जाते. “आयुर” म्हणजे आयुष्य आणि “वेद” म्हणजे ज्ञान. आयुर्वेद हे  परिपूर्ण आरोग्य मिळवण्यासाठी आपणास आयुष्याचे ज्ञान विषद करून सांगते.

 

होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक संयुक्त उपचार पद्धती

 

होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक संयुक्त उपचार पद्धती हे “अश्विनी-अनंत रुग्णालयाचे” वैशिष्ट्य आहे. दोन्ही उपचार पद्धतीचा संयुक्तपणे वापर करण्याचा उद्देश रुग्णाला जास्तीत जास्त परिणाम मिळावा आणि उपचार पद्धतीचा गुण येण्यासाठी जो दीर्घ कालावधी लागतो तो कमी करणे हाच होता.

 

कुठल्याही रोगामध्ये शरीराचा समतोल हा पूर्णपणे बिघडलेला असतो. रोगाचे मूळ नष्ट करण्यासाठी शरीरशुद्धी करण्यास आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सा उपयुक्त ठरते. शरीर शुद्धी झाल्यानंतर असे शरीर होमिओपॅथिक उपचारांना उत्तम प्रतिसाद देते. अशी संयुक्त उपचार पद्धत जुनाट आणि तीव्र स्वरूपाच्या आजारामध्ये वरदान ठरलेली आहे. अशा प्रकारचे जुनाट आजार बरा होण्यासाठी लागणारा कालावधी तुलनेने मोठा असतो. अशा प्रकारच्या संयुक्त उपचार पद्धतीमुळे कमी कालावधी मध्ये व्यक्तीचा रोग आटोक्यात येण्यास मदत होते.सर्वसधारणपणे कुठल्याही प्रकारचे शारीरिक, मानसिक, भावनिक स्थिती ज्या दीर्घ कालावधीसाठी दाबल्या गेल्या आहेत त्या न भडकता त्यांचा योग्य पद्धतीने निचरा होतो.

 

संयुक्त उपचार पद्धतीचा होणारा फायदा म्हणजे अनेक आयुर्वेदिक औषधे ही चूर्ण , काढे, वनौषधी अशा स्वरूपात असतात. तसेच ही औषधे घेण्यासाठी काही वेळा काही अटी आणि शर्तीचे पालन करावे लागते. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला अशा पद्धतीने काढे, चूर्ण घेणे शक्य होत नाही. तीच आयुर्वेदिक औषधे होमिओपॅथीक tincture form (liquid form)  मध्ये दिली तर अशी औषधे घेणे सहज सोपे होवून जाते. शिवाय औषधांचे संशोधनांती सिद्ध केलेले संयुक्तीकरण रुग्णाला उत्कृष्ट परिणाम देतेअसे सिद्ध झाले आहे.