1. जुनाट आणि तीव्र अशा दोन्ही प्रकारच्या आजारात होमिओपॅथी चा उपयोग केला जावू शकतो का ?

होय.  जुनाट आणि तीव्र अशा दोन्ही प्रकारच्या आजारांमध्ये होमिओपॅथी उपचार पद्धती परिणामकारक ठरते. जुनाट आणि लवकर न बऱ्या होणाऱ्या आजारांमध्ये होमिओपॅथी औषधांचा परिणाम चांगल्या प्रकारे दिसून येतो. अगदी तीव्र स्वरूपांच्या आजारांमध्ये देखील होमिओपॅथी चे परिणाम अगदी कमीत कमी कालावधी मध्ये उत्तम रीतीने मिळताना दिसून येतात. खूप सगळे रुग्ण हे इतर सर्व उपचार झाल्यानंतर होमिओपॅथी कडे वळताना दिसून येतात. जुनाट रोगांच्या रुग्णांच्या बाबतीत असा अनुभव खूप वेळा येतो. होमिओपॅथी औषधांचे वैशिष्ट्य म्हणजे हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते तसेच steroidical medicines चे झालेले दुष्परिणाम देखील घालवून टाकते.

 

 1. होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक संयुक्त उपचार पद्धतीचे काय फायदे आहेत ?

दोन्ही उपचार पद्धतीचा संयुक्तपणे वापर करण्याचा फायदा म्हणजे रुग्णाला जास्तीत जास्त चांगलापरिणाम मिळतो आणि उपचार पद्धतीचा गुण येण्यासाठी जो दीर्घ कालावधी लागतो तो कमी करता येतो. सर्वसधारणपणे कुठल्याही प्रकारचे शारीरिक, मानसिक, भावनिक स्थिती ज्या दीर्घ कालावधीसाठी दाबल्या गेल्या आहेत त्या न भडकता त्यांचा योग्य पद्धतीने निचरा होतो.संयुक्त उपचार पद्धतीचा होणारा फायदा म्हणजे अनेक आयुर्वेदिक औषधे ही चूर्ण , काढे, वनौषधी अशा स्वरूपात असतात. तसेच ही औषधे घेण्यासाठी काही वेळा काही अटी आणि शर्तीचे पालन करावे लागते. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला अशा पद्धतीने काढे, चूर्ण घेणे शक्य होत नाही. तीच आयुर्वेदिक औषधे होमिओपॅथीक tincture form (liquid form)  मध्ये दिली तर अशी औषधे घेणे सहज सोपे होवून जाते. शिवाय औषधांचे संशोधनांती सिद्ध केलेले संयुक्तीकरण रुग्णाला उत्कृष्ट परिणाम देते असे सिद्ध झाले आहे.

 

 1. होमिओपॅथी आणि बाकीच्या उपचार पद्धतीमध्ये काय फरक आहे?

“होमिओपॅथी फक्त रोगाच्या लक्षणावर उपचार करण्यावर भर देत नाही तर रोग हा ज्या शरीराचा भाग आहे त्या संपूर्ण शरीराचे मनाचे चलनवलन कसे ठीक करता येईल हे पाहते.याउपचारामध्ये मानसिकतेचा , मानसिक दृष्टीकोनाचा कसोशीने विचार करते. काट्याने काटा काढणे अथवा विषाने विष मारणे अशा उक्तीनुसार “Like Cures Like” या तत्वावर ही उपचार प्रणाली काम करते. औषधांचे अंगभूत गुणधर्म विकसित करून आणि वाढवून (potentiality)  रोग समूळपणे नष्ट कसा करता येईल यावर  होमिओपॅथी मध्ये भर दिला जातो.

जेव्हा बाकीच्या उपचार पद्धतीमध्ये रोगांच्या फक्त बाह्य लक्षणावर उपचार करून तो रोग दाबून टाकला जातो त्या विरुद्ध होमिओपॅथी मध्ये रोग्यांची प्रतिकार क्षमता वाढवली जाते. होमिओपॅथीक औषधे रोग्यांच्या नर्व्हज सिस्टीम वर परिणाम करून रोगाचे समूळ कारण नष्ट करून टाकतात.

 

 1. औषधांचे लहान लहान आकाराचे डोस घेत राहणे हे होमिओपॅथीचे वैशिष्ट्य समजले जाते? असे औषधांचे डोस परिणामकारक ठरतात का ?

होमिओपॅथी चे तत्व हे तिच्या potentised form वर आधारलेले आहे. रोगाच्या लक्षणानुसार त्याला बरे करण्यासाठी औषधांची क्षमताPotency त्या प्रकारे वाढवली जाते. होमिओपॅथी उपचार शरीराचा समतोल सुधरवतात. अशा प्रकारच्या उपचारांमध्ये शरीराचे कुठलेही नुकसान न करता रोग मुळापासून बरा केला जातो. होमिओपॅथी मुळे अनेक गुंतागुंतीचे केसेस बरे झाल्याची उदाहरणे आहेत. ही उदाहरणे होमिओपॅथीच्या लहान मात्रेच्या dosage  चे आरोग्यावरील महत्व अधोरेखित करतात.

 

 1. होमिओपॅथीउपचार घेताना कोणती पथ्य पाळली गेली पाहिजेत

कॉफी, कच्चा कांदा, कच्चा लसूण, मिंट उत्पादने, कापूरइ.  होमिओपॅथी औषधे नर्व्ह्ज  सिस्टीम वर परिणाम करतात त्यासाठी पथ्य आवश्यक ठरते. त्यामुळेच प्रत्येक डोस मध्ये १५-२० मिनिटाचे अंतर ठेवणे तसेच औषध घेतल्यानंतर किमान एक तास न झोपणे अशा काही पथ्याचा यामध्ये सामावेश होतो.

 

 1. होमिओपॅथी औषधे कितपत सुरक्षित ठरतात ?

होमिओपॅथी औषधांचा प्रयोग हा मानवी शरीरावर संपूर्णत: सुरक्षित असा सिद्ध झालेला आहे. त्यामुळे ही औषधे मानवी शरीरात घेण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आहेत.

 

 1. होमिओपॅथी उपचार पद्धती घेताना रुग्णाला त्याची संपूर्ण माहिती आणि पूर्व इतिहास सांगावा लागतो त्याचे काय कारण आहे ?

असम्हणतात की प्रत्येक रोगाचे कारण हे रुग्णाच्या दाबून टाकलेल्या भूतकाळामध्ये दडलेले असते. आपल्या कडे आलेल्या रुग्णाच्या पुर्वैतिहास मधून माहिती गोळा करून  त्याचे विश्लेषण करणे आणि रोगाचे मूळ शोधून काढणे हे प्रत्येक होमिओपॅथ चे काम असते. शरीरात वाहणाऱ्या उर्जेला नक्की कुठे आणि कसा अडथळा निर्माण झाला आहे हे शोधून काढण्याचा या पाठीमागच उद्देश असतो. कारण त्याच्या नंतरच रुग्णाला बरे करण्यासाठी परिणामकारक औषध योजना करता येते.

 

 1. होमिओपॅथी मध्ये कुठले Steroids वापरले जातात का ?

नाही. कुठल्याही प्रकारच्या होमिओपॅथी औषधांमध्येSteroids वापरले जात नाही. ही औषधे वनस्पती, खनिजे, प्राण्यांचे विष, प्राण्यांचे अवयव, शरीराचा विशिष्ट रोगट भाग, allopathy medicins चा काही भाग अशा घटकांपासून तयार केली जातात.

 

 1. गर्भवती बायका आणि डायबेटीस चे रुग्ण यांच्यासाठी होमिओपॅथी सुरक्षित आहे का ?

होय. या सर्वांसाठी होमिओपॅथी १००% सुरक्षित आहे. होमिओपॅथीमध्ये घेण्यात येणाऱ्या औषधांच्या मात्रेमध्ये वापरल्या जाणाऱ्या साबुदाण्यासारख्या पांढऱ्या गोळ्यांचा रक्तातील साखरेवर परिणाम होत नाही. डायबेटिक स्टेज मध्ये निर्माण होणाऱ्या दुष्परिणामांचानिचरा करण्यासाठी होमिओपॅथी उपयोगी पडते.

 

 1. होमिओपॅथी कशा प्रकारे काम करते ?

होमिओपॅथी शरीराची रोगप्रतिकार क्षमता वाढवते. ज्यायोगे शरीर स्वतः शरीरामध्ये निर्माण झालेल्या आजाराचा यशस्वीपणे मुकाबला करते आणि रुग्ण बरा होतो. होमिओपॅथी औषधे हे व्यक्तीच्या आजाराची तसेच तिच्या शारीरिक , मानसिक आणि भावनिक अवस्थेची लक्षणे बघून दिली जातात.

 

 1. आयुर्वेदामधील नाडी परीक्षा काय आहे ?

आयुर्वेदामध्ये नाडी परीक्षा हा अत्यंत महत्वाचा भाग मानला जातो. प्राचीन काळापासून रुग्णाच्या शरीरात असलेल्या आजाराची लक्षणे अचूक ओळखण्याची पद्धत म्हणून नाडीपरीक्षा ओळखली जाते. रोगाचे लक्षणे ओळखून त्यावर योग्य उपचार ठरवण्यासाठी नाडी परीक्षेचा वापर केला जातो. शरीरामध्ये असलेले त्रिदोष ओळखण्यासाठी देखील नाडी परीक्षेचा उपयोग केला जातो.

 

 1. जुनाट आणि तीव्र अशा दोन्ही प्रकारच्या आजारात आयुर्वेदा चा उपयोग केला जावू शकतो का ?

होय. आयुर्वेद जुनाट आणि तीव्र अशा दोन्ही प्रकारच्या आजारांमध्ये आयुर्वेद उपचार पद्धती परिणामकारक ठरते. पचनसंस्थेच्या तसेच , मानसिक तणाव , जुनाट आणि लवकर न बऱ्या होणाऱ्या आजारांमध्येआयुर्वेदीक औषधांचा परिणाम चांगल्या प्रकारे दिसून येतो. जुनाट आजार अगदी सुरुवातीच्या काळात लक्षात येवून त्यावर उपचार सुरु झाला तर असाध्य रोग देखील आटोक्यात येवू शकतात. आयुर्वेदिक औषध्येदेखीलsteroidical medicins चे झालेले दुष्परिणाम देखील घालवून टाकते. मोठमोठ्या शस्त्रक्रिये नंतर शरीरावर झालेले दुष्परिणाम घालवून टाकण्यासाठी आयुर्वेदिक उपचार पद्धतिचा उपयोग होतो.

 

 1. होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक संयुक्त उपचार पद्धतीचे काय फायदे आहेत ?

 

दोन्ही उपचार पद्धतीचा संयुक्तपणे वापर करण्याचा उद्देश  म्हणजे रुग्णाला जास्तीत जास्त परिणाम मिळावा   आणि उपचार पद्धतीचा गुण येण्यासाठी जो दीर्घ कालावधी लागतो तो कमी करतायावा असा आहे. सर्वसधारणपणे कुठल्याही प्रकारचे शारीरिक, मानसिक, भावनिक स्थिती ज्या दीर्घ कालावधीसाठी दाबल्या गेल्या आहेत त्या न भडकता त्यांचा योग्य पद्धतीने निचरा  अशासंयुक्त उपचारांमध्ये होतो.संयुक्त उपचार पद्धतीचा होणारा फायदा म्हणजे अनेक आयुर्वेदिक औषधे ही चूर्ण , काढे, वनौषधी अशा स्वरूपात असतात. तसेच ही औषधे घेण्यासाठी काही वेळा काही अटी आणि शर्तीचे पालन करावे लागते. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला अशा पद्धतीने काढे, चूर्ण घेणे शक्य होत नाही. तीच आयुर्वेदिक औषधे होमिओपॅथीक tincture form (liquid form)  मध्ये दिली तर अशी औषधे घेणे सहज सोपे होवून जाते. शिवाय औषधांचे संशोधनांती सिद्ध केलेले संयुक्तीकरण रुग्णाला उत्कृष्ट परिणाम देते असे सिद्ध झाले आहे.

 

 1. आयुर्वेद मला वजन कमी करून देण्यासाठी मदत करू शकते का ?

होय. आयुर्वेदिक उपचार पद्धती लठ्ठपणाची शरीराची मूळ प्रवृत्ती(Body Tendancy) नष्ट करण्यात अत्यंत परिणामकारक ठरली आहे. पंचाकर्माद्वारे शरीरामधील विषद्रव्ये काढून टाकल्यावर शरीर हलके होते आणि उपचारांना तसेच व्यायाम आणि आहार नियंत्रणाला उत्तम रीतीने प्रतिसाद देते.

 

 1. आयुर्वेद आणि होमिओपॅथी चिकित्सेचे कुठले दुष्परिणाम आहेत का?

नाही. या दोन्ही उपचार पद्धती चा शरीरावर दुष्परिणाम होत नाही. या दोन्ही उपचार पद्धती मध्ये रोग मुळापासून नष्ट करण्यावर भर दिला जातो. ज्याचे परिणाम कायम  टिकणारे असतात.

 

 1. मी होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक उपचार चालू केले असता Vitamins च्या गोळ्या खावू शकतो का ?

होय. होमिओपॅथ च्या सल्ल्याने अशा vitamins  च्या गोळ्यांचे सेवन उपचार चालू असताना केले जावू शकते.