आयुर्वेद आणि होमीओपॅथीचा संगम परिपूर्ण आरोग्यासाठी

 

रोगांवर उपचार करणाऱ्या भारतीय उपचार पद्धतीचे स्वतंत्र अस्तित्व आणि तिचे वेगळेपण हे प्राचीन काळापासून आजतागायत टिकून आहे. यामध्ये उपचार हा फक्त इलाज म्हणून केला न जाता संपूर्ण जीवन शैली मध्ये बदल घडवून शरीरामधून रोगाचं समूळ अस्तित्व नष्ट करून शरीर, आत्मा आणि मन यातिन्हीच्या संगमा मधून परिपूर्ण आरोग्याची संकल्पना विषद केली आहे.

कुठल्याही रोगावर उपचार करताना केवळ त्या रोगाच्या लक्षणावर बाह्योपचार न करता संपूर्ण पणे त्या व्यक्तीच्या सर्वांगीण आरोग्यासाठी उपचार करणेहे आपल्या भारतीय उपचार पद्धतीचे सार आहे. प्राचीन काळापासून चालत आलेल्या याच  आरोग्य प्रणालीचे हेच तत्व आयुर्वेद आणि होमिओपॅथी च्या संयुक्त उपचारमाध्यमातून  “अश्विनी –अनंतहोमिओपॅथीक आणि आयुर्वेदिक रुग्णालय” नेसाकार केलेले आहे.

होमिओपॅथी उपचार पद्धती ही आज एक सर्वांगीण, सर्ववव्यापीआणि अजोड अशी उपचार पद्धती म्हणून ओळखली जाते. आयुर्वेदा प्रमाणे ही देखील पॅथी उपचारामध्येमानसिकतेचा, मानसिक दृष्टीकोनाचा कसोशीने विचार करते. काट्याने काटा काढणे अथवा विषाने विष मारणेअशा उक्तीनुसार “Like Cures Like” या तत्वावर हीउपचार प्रणाली काम करते. औषधांचे अंगभूत गुणधर्म विकसित करून आणि वाढवून (potentiality) रोग समूळपणे नष्ट कसा करता येईल यावर होमिओपॅथी मध्ये भर दिला जातो.

आपल्या बहुसंख्य रोगांचे मूळ हे आपण खात असलेल्या आहारामध्ये असल्यामुळे समतोल आहार शैली आणिवनौषधीचा उपयोग या गोष्टींचा आयुर्वेदा मध्ये प्राधान्याने विचार केलेला आहे.

 

” येणाऱ्या भविष्यामधील डॉक्टर हा औषधाने उपचार करणारा नाही तर सकसअन्न धान्याच्या मदतीने रोग बरा करणारा डॉक्टर असेल. ”    

थॉमस अल्वा एडिसन

एडिसन ने म्हटल्या प्रमाणे आजचे आधुनिक विज्ञान देखील या गोष्टीचे समर्थन करते की डॉक्टर ला आपल्या पेशंट ला बरे करण्यासाठी आज औषधांपेक्षा जास्तीतजास्त निरनिराळ्या प्रकारच्या सकस अन्न धान्यांची मदत घ्यावी लागत आहे आणि तशी मदत त्यांनी घेतली देखील पाहिजे. हेच तत्व प्रथमपासून आपल्या आयुर्वेदाने विषद करून सांगितलेले आहे.

उपचार हा केवळ वरवरचा बरा करणाराकडवट अनुभव न राहता तो एक आनंददायी प्रवास बनला पाहिजे ज्याच्या माध्यमातून व्यक्तीचे शरीर, मनआणिआत्मासमर्थ बनेल. आमच्या साठी ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे की , “अश्विनी-अनंतरुग्णालयाच्या” माध्यमातून गेली २० वर्षे हजारो लोकांना  होमिओपॅथी आणि आयुर्वेदाचे संयुक्त उपचार दिले गेले आहेत. या संयुक्त उपचार पद्धतीमधून अनेक लोकांना त्यांच्या आजारातून कायमचा दिलासा मिळालेला आहे.

“अश्विनी –अनंत होमिओपॅथीक आणि आयुर्वेदिक रुग्णालय” हे रुग्णांच्या सेवेसाठी संपूर्णपणे सुसज्ज असून उपचाराच्या संपूर्ण सोयींबरोबरच प्रशस्त जागा, शांत वातावरण, आरामदायक उपचार हे येथील वैशिष्ट्य आहे. सततच्या अभ्यास आणि संशोधनाच्या माध्यमातून उपचार पद्धतीमध्ये सतत नवनवीन सुधारणा करत राहणे जेणेकरून रुग्णाला अधिक चांगला परिणाम मिळेल यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.

इथे केल्या जाणाऱ्या संपूर्ण उपचार पद्धती या रुग्णाच्या परिस्थितीनुसार आणि आवश्यकतेनुसार   सिद्ध केल्या जातात. यामध्ये होमिओपॅथी उपचार, आयुर्वेदिक उपचार, काही असाध्य रोगांसाठी सहज घेता येतील अशी होमिओपॅथी फोर्म मध्ये बनवलेली आयुर्वेदिक औषधे, पुष्पौषधी, पंचकर्म उपचार, आहार पद्धती, योगसाधना, इ. उपचारांचा समावेश आहे. केवळ वरवर उपचार करून रोग दाबून टाकण्यापेक्षा तो शरीरातून समूळ नष्ट करणे हेच आमच्या उपचार पद्धतीचे ध्येय आहे.

“अश्विनी –अनंत रूग्णालया” मध्ये करण्यात येणाऱ्या  उपचार पद्धती मध्ये संपूर्ण मानके आणि परिमाणे पाळली जातात. तुमच्या कडून येणाऱ्या प्रतिसादाचे आम्ही स्वागत करतो.

 

  जिथे उपचार आरोग्याची एक आनंदयात्रा बनते अशा ठिकाणी तुमचे स्वागत आहे.